Sunday, November 21, 2021

 लसीकरण हलगर्जीपणा भोवला दोन ग्रामसेवक निलंबित

वाशिम दि.19 (जिमाका) कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्याची मोहीम सूक्ष्म नियोजनातून राबविण्यात येत आहे. यासाठी लसीकरण केंद्रावर कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहे. सुट्ट्यांच्या दिवशी देखील लसीकरण केंद्रातून लसीकरण करण्यात येत आहे. 
            आज 19 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी कारंजा आणि मंगरुळपीर तालुक्यातील तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम यांनी वाशिम तालुक्यातील काही गावातील लसीकरण केंद्राला आकस्मिक भेटी दिल्या. या भेटीदरम्यान मंगरूळपीर तालुक्यातील शिवनी येथील ग्रामसेवक अनंता गायकी आणि वाशिम तालुक्यातील सावळी येथील ग्रामसेवक श्री.मळघणे हे गैरहजर आढळून आले. त्यांच्या या गैरहजरीची दखल घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम यांनी आज 19 नोव्हेंबर रोजी एका आदेशाद्वारे या दोन्ही ग्रामसेवकांना निलंबित केले.      
     जिल्ह्यात कोरोना लसीकरणासाठी जिल्हा व तालुका पातळीवर वारंवार सभा घेण्यात येत आहे. लसीकरणासाठी कर्मचाऱ्यांना जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या असून त्याबाबत त्यांना तसे लेखी आदेश दिले आहे.इतर जिल्ह्याच्या तुलनेत जिल्ह्यात दररोजचे लसीकरणाचे प्रमाण हे इतर जिल्ह्याच्या तुलनेत कमी आहे. लसीकरण करण्यासाठी नियुक्त केलेले काही कर्मचारी लसीकरणाचे काम गांभीर्याने घेत नसल्याचे वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आकस्मिक भेटीतून दिसून आले आहे.त्यामुळे त्यांच्यावर निलंबनासारखी कारवाई करण्यात येत आहे.

 

Saturday, November 6, 2021

दिवाळी सणानिमित्त श्री शिवाजी विद्यालयाने पत्रकारांचा केला सत्कार

 
 
 

मालेगाव ता. प्र.सुरज अवचार  :- दिवाळी सणानिमित्त मालेगाव तालुक्यातील जउळका येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या वतिने पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.

         याप्रसंगी एक व्रतस्थ पत्रकारांचा सन्मान करण्याची संधी मिळाली हे मोठे भाग्य आहे त्यांनी प्रत्येक लढ्यात सक्रिय भुमिका निभावली

 पत्रकारीतेच्या माध्यमातून जनमत तयार करण्याचे काम केले अशा शब्दांत प्रा. दिपक आंधळे सर यांनी पत्रकांराचा गौरव करण्यात आला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी पत्रकारितेच्या माध्यमातून जनमत तयार करण्याचे काम पत्रकार यांनी केले. आदर्श पत्रकारांसाठी असणारे सर्वगुण त्यांच्यात आहेत. लोकशाहीत सत्ताधाऱ्यांवर माध्यमांचा अंकुश असायला पाहिजे, पत्रकारांना निपक्षपणे काम करता आले पाहिजे. लोकशाहीच्या चौथा स्तंभाच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे.

      याप्रसंगी सन्माननीय पाहुण्याच्या हस्ते दिव्य वाशिम चे मुख्य संपादक सारनाथ अवचार, लोकमतचे प्रदिप बरगट, सकाळचे महेश व्यास, भारत संग्रामचे नागेश अवचार, तरुण भारतचे दसपुते, दैनिक महासागरचे राम सावळे, पत्रकार गोपाल खोपडे, यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

       सत्काराला उत्तर देताना दिव्य वाशिमचे मुख्य संपादक सारनाथ अवचार यांनी पत्रकार हे जनता व प्रशासन यांच्या मधील दुवा असुन जनतेच्या समस्या वर्तमान पत्रातून मांडण्याचे अहोरात्र काम करत असतात व जनतेला न्याय देण्याचा पत्रकारांचा प्रयत्न असतो या भागातील जनतेच्या समस्या वर्तमान पत्रातून मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी रंजितराव घुगे सरपंच वडी,  डाँ सागर मालपाणी, शेख अतीक, राम मंत्री, बाळु कव्हर, दिनेश पाटिल, विष्णू पाटिल सुरशे, कुटे पाटिल, कढणे पाटिल, आंधळे सर, गोकुळ आठवले, शिक्षक व शिक्षकत्तर कर्मचारी, व गावातील नागरिक उपस्थित होते

 

 

  लसीकरण हलगर्जीपणा भोवला दोन ग्रामसेवक निलंबित वाशिम दि.19 (जिमाका) कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्याच...