Sunday, August 1, 2021

जऊळका पोलीस स्टेशन मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

 
 

जऊळका वार्ताहर :-शाहिरीतून समाज प्रबोधन करणारे महामानव लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 101 जयंती आज एक ऑगस्ट रोजी जऊळका पोलीस स्टेशन मध्ये साजरी करण्यात आली.

 अण्णाभाऊ साठे हे समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. अण्णाभाऊ साठे एका दलित समाजामध्ये जन्मलेले महान व्यक्ती होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते.अण्णाभाऊंच्या प्रेरणेने आज समाजामध्ये क्रांती होताना दिसत आहे.अशा या महामानवाची जयंती प्रतिमेची पूजन करून जऊळका पोलीस स्टेशन मध्ये साजरी करण्यात आली.याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक राजेश पंडित  ,प्रवीण डोंगरे, कांबळे ,बेलोकार, राठोड, तोडीवाले,  महल्ले, सनी दाभाडे, महेंद्र दाभाडे ,अनिल सोलव, गुप्ता मेजर, शुभम खडसे हितेश खडसे, ईत्यादी कर्मचारी हजर होते.


No comments:

Post a Comment

  लसीकरण हलगर्जीपणा भोवला दोन ग्रामसेवक निलंबित वाशिम दि.19 (जिमाका) कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्याच...