Tuesday, July 27, 2021

 
गौण खनिजांच्या वाहतुकीमुळे रस्त्यांची दुर्दशा!
 

मालेगाव - तालुक्यामधून अकोला नांदेड महामार्ग आणि समृद्धी महामार्ग जात असून त्यांचे मोठ्या प्रमाणात काम जोरात चालू आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात गौण खनिज लागत असून त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त जवळ वाहतुकीमुळे तालुक्यातील महामार्गालगतच्या गावातील रस्त्याची वाट लागली आहे. समृद्धी महामार्ग अकोला नांदेड या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी लागणाऱ्या गौण खनिजाची वाहतूक मोठ्या प्रमाणात होऊन क्षमतेपेक्षा जास्त जड वाहतूक करणारे वाहन मुळे तालुक्यातील कवरदरी . वरदरी अमानवाडी सुकांडा जामखेड इत्यादी गावांमध्ये जोडणाऱ्या पोच मार्गाचे मोठ्या प्रमाणात चाळणी होऊन रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. रस्त्याने चालताना दुचाकी चारचाकी वाहन चालकासह पायदळ चालणाऱ्यांना सुद्धा जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे .त्यातच रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्यावर पाणी साचत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

  लसीकरण हलगर्जीपणा भोवला दोन ग्रामसेवक निलंबित वाशिम दि.19 (जिमाका) कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्याच...