Wednesday, July 21, 2021

 अनोळखी इसमाचा रेल्वेतून पडून मृत्यू.

                    

मालेगाव (तालुका प्रतिनिधी);-कालच सुरू झालेल्या डेमो लोकलने आज सकाळी पूर्णाकडून अकोला कडे जाणाऱ्या रेल्वे मधून एका इसमाची पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. प्राप्त माहितीनुसार आज दिनांक 21 जुलै सकाळी साडे दहा ते अकरा च्या दरम्यान पूर्णा ते अकोला जाणाऱ्या लोकल पॅसेंजर मधून अनोळखी इसम अंदाजे वय 45 वर्षे रेल्वेमधून पडून मृत्यू झाला सदर घटना ही जऊळका रेल्वे गेट पासून काही अंतरावर घडली असून त्या अनोळखी इसमाच्या अंगावर लाल रंगाचे टी-शर्ट असून त्यावर एअरटेल नाव लिहिलेले आहे तसेच त्याच्या आणि अंगावर निळ्या रंगाची पॅंट आहे .या घटनेचा पुढील तपास जऊळका पोलिस करीत आहेत.

 

  

              

           

             

             



No comments:

Post a Comment

  लसीकरण हलगर्जीपणा भोवला दोन ग्रामसेवक निलंबित वाशिम दि.19 (जिमाका) कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्याच...