डॉ.गोपाल पाटिल हाँस्पिटल वाशिम येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात साजरा.
वाशिम :-
डॉ.गोपाल पाटिल हाँस्पिटल वाशिम
येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.वृक्षलागवड हा निवळ
एक सरकारी उपक्रम न राहता ही एक लोकचळवळ व्हावी, या
उदेश
ठेवुन
वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन
करण्यात आले होते. या वेळी संकल्पबहुउद्देशीय शिक्षण संस्था जउळका (रेल्वे) चे अध्यक्ष सुरज अवचार यांनी आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात उस्फूर्त सहभाग घेतला.यावेळी हाँस्पिटल चे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल पाटिल (जंगले) साहेब, हरीभाऊ जंगले, डॉ. पुजा ईढोळे मॅडम,डॉ.सचिन सुतार सर, वैभव अल्लाडा ,पवन माळकर ,धिरज आगमकर या सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला. वाशिम येथील नागरिक आणि विद्यार्थी यांनी झाडे लावा झाडे जगवा या घोषणा देत वृक्षारोपण मोहिमेत सहभाग घेतला.संकल्प बहुउद्देशीय शिक्षण संस्था जउळका रेल्वे चे अध्यक्ष सुरज अवचार यांनी गावात जन्माला येणाऱ्या बालकांच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी शुभेच्छा वृक्ष, गावातील ज्या तरुणांचे विवाह होतील त्यासाठी शुभमंगल वृक्ष, कौतुकसोहळ्यासाठी आनंद वृक्ष, गावातील कन्यांचे विवाह होतात त्या कारणासाठी माहेरची झाडी आणि मृत व्यक्तीच्या स्मृती जपण्यासाठी स्मृती वृक्ष लावण्यात यावेत, असे आवाहन केले आहे.
No comments:
Post a Comment