Friday, July 30, 2021

 रोड राबरी प्रकरणातील फ़रार आरोपीच्या आवळल्या पोलीसांनी मुसक्या.

   मालेगांव :- 30/07/2021 

रिसोड रोड राबरी प्रकरणात पोलीसाना हवा असलेला फ़रार आरोपी सचीन रसाळ हा वाशिम स्थानिक गुन्हे शाखा यांना हवा होता.सदर्हु आरोपी पोलीसाच्या हातावर तुरी देवुन  जऊळका या गावाच्या दिशेन पळाला  असल्याची माहीती मिळाल्य़ावरुन पोलीसानी जऊळका या गावाकडे आरोपीच्या शोधात धाव घेतली व जऊळका बस स्ट्ड्वर स्थानिक पोलीसाच्या च्या मदतीने व गावक-याच्या मदतीने आरोपीला पकडण्यात पोलीसाना यश आले. मात्र आरोपी पकडण्यात पोलीसांची चांगलीच दमछाक झाली होती यावेळी नागरीकांनी  पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती.


 

Tuesday, July 27, 2021

 
गौण खनिजांच्या वाहतुकीमुळे रस्त्यांची दुर्दशा!
 

मालेगाव - तालुक्यामधून अकोला नांदेड महामार्ग आणि समृद्धी महामार्ग जात असून त्यांचे मोठ्या प्रमाणात काम जोरात चालू आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात गौण खनिज लागत असून त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त जवळ वाहतुकीमुळे तालुक्यातील महामार्गालगतच्या गावातील रस्त्याची वाट लागली आहे. समृद्धी महामार्ग अकोला नांदेड या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी लागणाऱ्या गौण खनिजाची वाहतूक मोठ्या प्रमाणात होऊन क्षमतेपेक्षा जास्त जड वाहतूक करणारे वाहन मुळे तालुक्यातील कवरदरी . वरदरी अमानवाडी सुकांडा जामखेड इत्यादी गावांमध्ये जोडणाऱ्या पोच मार्गाचे मोठ्या प्रमाणात चाळणी होऊन रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. रस्त्याने चालताना दुचाकी चारचाकी वाहन चालकासह पायदळ चालणाऱ्यांना सुद्धा जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे .त्यातच रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्यावर पाणी साचत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Wednesday, July 21, 2021

 अनोळखी इसमाचा रेल्वेतून पडून मृत्यू.

                    

मालेगाव (तालुका प्रतिनिधी);-कालच सुरू झालेल्या डेमो लोकलने आज सकाळी पूर्णाकडून अकोला कडे जाणाऱ्या रेल्वे मधून एका इसमाची पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. प्राप्त माहितीनुसार आज दिनांक 21 जुलै सकाळी साडे दहा ते अकरा च्या दरम्यान पूर्णा ते अकोला जाणाऱ्या लोकल पॅसेंजर मधून अनोळखी इसम अंदाजे वय 45 वर्षे रेल्वेमधून पडून मृत्यू झाला सदर घटना ही जऊळका रेल्वे गेट पासून काही अंतरावर घडली असून त्या अनोळखी इसमाच्या अंगावर लाल रंगाचे टी-शर्ट असून त्यावर एअरटेल नाव लिहिलेले आहे तसेच त्याच्या आणि अंगावर निळ्या रंगाची पॅंट आहे .या घटनेचा पुढील तपास जऊळका पोलिस करीत आहेत.

 

  

              

           

             

             



  लसीकरण हलगर्जीपणा भोवला दोन ग्रामसेवक निलंबित वाशिम दि.19 (जिमाका) कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्याच...