राज्य शासनाकडून प्राप्त ७ रुग्णवाहिकांचे
प्राथमिक आरोग्य केंद्रांना वितरण
वाशिम, दि. ०२ (जिमाका) : ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर उपचार प्राप्त होण्यासाठी राज्य शासनामार्फत जिल्ह्यातील ७ प्राथमिक आरोग्य केंद्रांना नवीन रुग्णवाहिका प्राप्त झाल्या आहेत. या रुग्णवाहिकांचे आज, २ जून रोजी जिल्हा परिषदेचे प्रभारी अध्यक्ष डॉ. श्याम गाभणे, आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती चक्रधर गोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांच्या उपस्थितीत वितरण करण्यात आले.
कारंजा तालुक्यातील धनज, उंबर्डा बाजार व मनभा प्राथमिक आरोग्य केंद्र, रिसोड तालुक्यातील कवठा व मोप प्राथमिक आरोग्य केंद्र, वाशिम तालुक्यातील वारला प्राथमिक आरोग्य केंद्र आणि मंगरूळपीर तालुक्यातील वनोजा प्राथमिक आरोग्य केंद्राला सदर रुग्णवाहिका वितरीत करण्यात आल्या. या रुग्णवाहिकांमुळे सदर प्राथमिक आरोग्य केंद्र क्षेत्रातील गंभीर व अतिगंभीर रुग्ण तसेच वयोवृद्ध, गरोदर महिला, बालके यांना तत्काळ आरोग्य सेवा व संदर्भ सेवा देण्यास मदत होईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आहेर यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment