Friday, June 18, 2021

 

 विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन.

वाशिमदि. १७ (जिमाका) : सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचे ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येण्याची शक्यता आहे. आरक्षित जागेवर प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. सदर प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी ज्या जिल्ह्यातून जातीचा दाखला प्राप्त केला आहे, त्या जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज करावा, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्यावतीने करण्यात आले आहे.

जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी नियमानुसार समितीकडे अर्ज केल्यानंतर तीन महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्राबाबत समिती निर्णय घेते. जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीस पुरेसा अवधी मिळावा. तसेच जात वैधता प्रमाणपत्रा अभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळण्यापासून वंचित राहू नये, यासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्याप वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर केला नसल्यास तातडीने ज्या जिल्ह्यातून जातीचा दाखला प्राप्त केला आहे, त्या जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा, असे जिल्हा जात प्रमाणपत्र समितीच्या सदस्य तथा उपायुक्त डॉ. सी. के. कुलाल यांनी कळविले आहे.

 

No comments:

Post a Comment

  लसीकरण हलगर्जीपणा भोवला दोन ग्रामसेवक निलंबित वाशिम दि.19 (जिमाका) कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्याच...