Saturday, May 29, 2021

जास्त दराने खतांची विक्री केल्यास कारवाई कृषी विभागाचा इशारा · खत खरेदीची ई-पॉस मशीनची पावती घ्यावी. · अडचणी व तक्रार निवारणासाठी टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. वाशिम, दि. 28 (जिमाका) : जिल्हयातील शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामात रासायनिक खतांची किंमतीपेक्षा जास्त दराने विक्री केल्यास खत विक्रेत्यांवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी तथा खत परवाना अधिकारी वाशिम यांनी दिला आहे. पावसाळयाची चाहुल लागताच जिल्हयातील शेतकऱ्यांची खरीप हंगामात रासायनिक खते व बियाण्यांच्या खरेदीची लगबग सुरु झाली आहे. युरीया वगळता इतर रासायनिक खताच्या किमती जरी वाढलेल्या असल्या तरी केंद्र शासनाने रासायनिक खतावरचे अनुदान वाढविल्यामुळे विविध कंपन्यामध्ये उत्पादीत होणाऱ्या रायानिक खताच्या 50 किलो बॅगच्या किमती जाहिर केल्या आहे. त्या पुढील प्रमाणे डी.ए.पी खत- इफको कंपनी- 1200 रुपये, जीएसएफसी- 1200 रुपये, जयकिसान झुवारी ॲग्रो- 1200 रुपये, कोरोमंडल- 1200 रुपये, महाधन- 1200 रुपये, कृभको- 1200 रुपये, स्मार्ट केम- 1200 रुपये आणि आयपीएल-1200 रुपये. 10:26:26 खत- इफको- 1175 रुपये, जीएसएफसी- 1175 रुपये, जयकिसान झुवारी ॲग्रो- 1375 रुपये, महाधन- 1390 रुपये, कृभको- 1300 रुपये, स्मार्ट केम- 1390 रुपये. 12:32:16 खत - इफको- 1185 रुपये, जीएसएफसी- 1185 रुपये, जयकिसान झुवारी ॲग्रो- 1310 रुपये, महाधन- 1370 रुपये, कृभको- 1310 रुपये, स्मार्ट केम- 1370 रुपये. 20:20:0:13 खत- इफको- 975 रुपये, जीएसएफसी- 975 रुपये, जयकिसान झुवारी ॲग्रो- 1090 रुपये, कोरोमंडल- 1050 रुपये, आरसीएफ- 975 रुपये, महाधन- 1150 रुपये, कृभको-1050 रुपये, स्मार्ट केम- 1150 रुपये, आयपीएल-1050 रुपये. 19:19:19 खत- जयकिसान झुवारी ॲग्रो- 1575 रुपये, 28:28:00 खत- जयकिसान झुवारी ॲग्रो- 1475 रुपये, कोरोमंडल- 1450 रुपये, 14:35:14 खत- जयकिसान झुवारी ॲग्रो- 1365 रुपये, कोरोमंडल- 1400 रुपये, 24:24:0:8 खत- कोरोमंडल- 1500 रुपये, महाधन- 1450 रुपये, 15:15:15:09 खत- कोरोमंडल- 1150 रुपये, आयपीएल- 1100रुपये, 16:20:0:13 खते- कोरोमंडल- 1000 रुपये, 15:15:15 खते- आरसीएफ 1060 रुपये, 14:28:00 खते- महाधन- 1280 रुपये, स्मार्ट केम- 1280 रुपये, 16:16:16 खते- महाधन- 1125 रुपये, स्मार्ट केम- 1125 रुपये, आयपीएल- 1125 रुपये आणि 14:35:14 खते- कोरोमंडल- 1400 रुपये असे रासायनिक खतांचे सुधारीत दर 20 मे 2021 पासून निश्चित केले आहे.

Wednesday, May 26, 2021

जऊळका येथे शुल्क कारणावरुन दोन गटात तुफ़ाण हाणामारी (जऊळका एक्सप्रेस न्युज ) दिंनाक २६/०५/२०२१ जऊळका :- वाशिम जिल्हातील जऊळका येथे दोन गटात तुफ़ाण हाणामारी झाली असुन वाद मिटविण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मच्या-यावर सुध्दा संतप्त जमावाने हल्ला चढविला या मध्ये काही पोलीस कर्मचारी जखमी झाले असुन प्रसंगाचे गांभिर्य ओळखुन पोलीस स्टेशन चे ठाणेदार मोरे यांनी अतिरिक्त पोलीस कुमक बोलावली असुन उपविभागीय पोलीस अधिकारी जऊळका येथे तळ ठोकुन आहेत. दरम्यान जऊळका येथे तणाव पुर्ण शांतता असुन गावाला छावणीचे रुप आले आहे.

Tuesday, May 25, 2021

लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांचे गावपातळीवरच संस्थात्मक विलगीकरणावर करा - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. वाशिम, दि. २४ ( जऊळका एक्सप्रेस न्युज ) : कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी बाधित रुग्णांचे संस्थात्मक विलगीकरण करणे आवश्यक आहे. याकरिता गावामध्येच विलगीकरण कक्षाची स्थापना करून लक्षणे नसलेल्या कोरोना बाधितांना त्याठिकाणी संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात यावे. या विलगीकरण कक्षामध्ये सर्व मुलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले. दुरदृश्य प्रणालीद्वारे आज, २४ मे रोजी आयोजित तालुकास्तरीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी (महसूल) सुनील विंचनकर, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार, शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, जिल्ह्यात सध्या कोरोना बाधितांच्या संख्येत घट होत आहे. मात्र, हा संसर्ग पुन्हा वाढू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोना बाधित रुग्णांचे विलगीकरण गावपातळीवर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता गावामधील शाळा, समाज मंदिर अथवा मुलभूत सुविधा उपलब्ध असलेल्या इतर ठिकाणी विलगीकरण कक्ष स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार सर्व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे नियोजन करून गावपातळीवर विलगीकरण कक्ष सुरु करण्याची कार्यवाही करावी. या कक्षामध्ये सर्व मुलभूत सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. तसेच आगामी पावसाळ्याच्या दिवसांत रुग्णांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी. लक्षणे नसलेल्या कोरोना बाधितांना गावातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार असून सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर स्वतंत्र विलगीकरण करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

Monday, May 24, 2021

जिल्ह्यात परवानाधारक रिक्षाचालकांना मिळणार अर्थसहाय्य · ऑनलाईन अर्ज स्विकारण्यास प्रारंभ · सुटीच्या दिवशीही कामकाज राहणार सुरु वाशिम, दि. २४ (जिमाका) : कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षाचालकांना एक वेळ अर्थसहाय्य म्हणून १५०० रुपये इतके मानधन देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. ही रक्कम थेट त्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यासाठी संगणक प्रणाली विकसीत करण्यात आली असून सर्व परवानाधारक रिक्षा चालकांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे. यामध्ये रिक्षाचालकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील मदत कक्ष सर्व कार्यालयीन दिवसांसोबत सुटीच्या दिवशीही सुरु राहणार आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी दिली आहे. परवानाधारक रिक्षाचालकास http://transport.maharashtra.gov.in/1133/Autorickshaw-Financial-Assistance-Scheme या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येईल. अर्ज सादर करतांना अर्जदाराच्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी क्रमांक प्राप्त होईल. या ऑनलाईन अर्जात वाहन क्रमांक, ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांक, ऑटोरिक्षा परवाना क्रमांक, वाहन क्रमांक, आधार क्रमांक नमूद करावा लागेल. वारसदार असल्यास तो पर्यायही निवडावा लागेल. आधार कार्ड ,मोबाईल क्रमांक आणि बॅंक खाते हे परस्परांशी संलग्न केलेले असणे अनिवार्य आहे. आपल्या अर्जाची प्रत्यक्ष स्थिती अर्जदार आपल्या मोबाईलवर तपासू शकतो. अर्जदाराने ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर परिवहन कार्यालयामार्फत अर्जातील नमूद तपशिलाची कार्यालयातील अभिलेख्यांशी पडताळणी केली जाईल. ही पडताळणी झाल्यानंतर ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज मंजूर करुन अर्जदाराच्या बॅंक खात्यात १५०० रुपये शासनाकडून जमा करण्यात येतील. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याने कार्यालयात येण्याची व उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. मात्र अर्ज भरतांना अडचण आल्यास कार्यालयाच्या मदत कक्षात ९८३४५५९७९७ या दूरध्वनीवर संपर्क साधावा. रिक्षाचालकांना तातडीची मदत उपलब्ध व्हावी, यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. हे कामकाज कार्यालयीन तसेच सुटीच्या दिवशीही सुरु राहणार आहे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. हिरडे यांनी कळविले आहे. *****

Saturday, May 22, 2021

 जऊळका पोलीसाकडुन विनाकारन फ़िरना-यावर कार्यवाही
दिंनाक २२/५/२०२१ (जऊळका एक्सप्रेस न्युज ) जऊळका येथे पोलीसाकडुन वारंवार सांगुन सुध्दा नागरीक ऐकत नसल्यामूंळे दि ब्रेक चे अंर्तगत कोरानाची साखळी तोडण्याकरीता विनाकारण रस्त्यावर फ़िरणा-याची कोराना चाचणी करण्यात आली त्यामुळे विनाकारण फ़िरणा-यावर आळा बसला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन

वाशिम, दि. २१ (जिमाका) : दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त आज, २१ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रम अधिकारी, कर्मचारी यांनी दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसानिमित्त शपथ घेतली.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. श्री. तोटावार यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसानिमित्त शपथ दिली.

 

  लसीकरण हलगर्जीपणा भोवला दोन ग्रामसेवक निलंबित वाशिम दि.19 (जिमाका) कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात पात्र व्यक्तींचे लसीकरण करण्याच...