कोरेगाव-भीमा प्रकरण: राज्य सरकार करणार समांतर चौकशी
मुंबई: महाविकास आघाडीत कळीचा मुद्दा ठरलेलं भीमा-कोरेगाव हिंसाचार व एल्गार परिषदेच्या तपासाचं प्रकरण आणखी तापण्याची चिन्हं आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडं देण्यास मान्यता दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला आहे. या प्रकरणाचा तपास राज्य सरकारनंही समांतर पातळीवर करावा, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतली आहे.